
महाराष्ट्राच्या सत्तांसंघर्षांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे गट आणि शिवसेनेच्या याचिकांची यादी करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विषयावर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे. यामुळे लवकरच शिंदे सरकार टिकणार की कोसळणार याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे याकड संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
“देवेंद्र फडणवीस हे दहावं आश्चर्य महाराष्ट्रात बसलंय”, संजय राऊतांचा हल्लाबोल
याबाबत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाची माहिती दिली आहे.बापट, निवडणूक आयोगासमोर आणि सुप्रीम कोर्टामध्ये आज दोन महत्त्वाच्या सुनावण्या पार पडणार आहेत. शिवसेनेमधून दोन तृतीयांश एकाच वेळी बाहेर पडले पाहिजे या गोष्टीला मी सहमत आहे. मात्र जे 16 लोकं बाहेर पडले ते दोन तृतीयांश होत नाहीत आणि जर हे अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांना मंत्री राहता येणार नाही. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद सुद्धा जाईल असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हंटलं आहे.
माझ्यासोबत दोनदा विश्वासघात झाला, फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान, या आधीच्या सुनावणीमध्ये शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने १६ आमदारांचे निलंबन प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्याची मागणी केली होती. या मागणीवर आज निर्णय घेतला जाऊ शकतो.
लग्न कार्यात काम करायला गेल्या होत्या मात्र घरी परतल्याच नाहीत; वाटेतच काळाने घातला घाला