
आख्ख्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajkta Mali) होय. प्राजक्ता एक उत्कृष्ट नृत्यांगना आणि सूत्रसंचालिका सुद्धा आहे. मराठी मालिका ( series) आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. कधी ती शेअर करत असलेल्या ग्लॅमरस फोटोशूटमूळे तर कधी तिच्या हटके पोस्टमुळे चर्चेत येते. व्हॅलेंटाईन डे निमित्त प्राजक्ताने एक पोस्ट केली आहे.
बीबीसीवर आयकर विभागाची धाड! काँग्रेसने केली केंद्र सरकारवर टीका
व्हॅलेंटाईन डे निमित्त सोशल मीडियावर प्रेमाचे वारे वाहू लागले आहे. अनेक कलाकार प्रेमाविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या सेलिब्रिटींविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या अफेअर विषयी चर्चा सुरू आहे. खरंच प्राजक्ता माळी कोणाच्या प्रेमात पडली आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच.
“…तर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकत”, वाचा नेमकं काय म्हणतात घटनातज्ञ
दरम्यान, प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या प्रेमाविषयी माहिती दिली आहे. लाल रंगाची साडी परिधान करून एकदम झकास फोटोशूट प्राजक्ताने केले आहे. पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहीलंय की, “तुम्ही स्वतःचेच व्हॅलेंटाइन व्हा. हाच झोन पुढे सुरू राहील. अखिल भारतीय सिंगल संघटनेचे सदस्य तुम्ही एकटे नाही मीही तुमच्यामध्ये सहभागी आहे.”
“देवेंद्र फडणवीस हे दहावं आश्चर्य महाराष्ट्रात बसलंय”, संजय राऊतांचा हल्लाबोल
प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकरी अगदी मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहीले की, असं असेल तर मला पण सिंगल राहायला आवडेल. तुझं सिंगल सेनेत स्वागत. दुसर्या एका युजरने तर थेट प्राजक्ताला प्रपोज केलं. त्याने लिहीले की, पण तू आमच्यात सामील होण्यापेक्षा आमच्यातून एकाला कमी का करत नाहीस.
माझ्यासोबत दोनदा विश्वासघात झाला, फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा