पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा निवडणुकांवरून राजकीय वातावरण रंगात आले आहे. कसब्यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक व चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूमुळे या रिक्त जागांसाठी या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या दोन्ही निवडणूका बिनविरोध होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सध्या तर प्रमुख पक्षांमध्ये चांगलीच लढत रंगली आहे.
भारतीय खेळाडू फीट राहण्यासाठी इंजेक्शन घेतात? निवड समितीच्या अध्यक्षांनी केले धक्कादायक खुलासे
कसब्यामध्ये ( Kasba भाजपच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. तर चिंचवड ( Chinchwad) मध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादी कडून नाना काटे व अपक्ष राहुल कलाटे यांच्यात मुख्य लढत आहे. या राजकीय गोंधळात मनसे अजूनही तळ्यात मळ्यात होती.
प्रेयसीची हत्या करून त्याच दिवशी दुसऱ्या मुलीशी केले लग्न; दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड
या पोटनिवडणुकांमध्ये मनसेची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान मनसे कडून आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत मनसेने भाजपाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप ( BJP) व मनसे नेत्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवनीत राणा व रवी राणा यांच रामदेव बाबांमुळेच जुळलं! दोघांची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी एकदा वाचाच