‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका आज प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेली 14 वर्ष ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (TMKOC) हा मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकार गेल्या काही दिवसांपासून रामराम ठोकताना दिसत आहेत.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या कुटूंबियांना जीवे
पण यातील अनेक कलाकारांना चाहते आजही विसरु शकलेले नाहीत. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन या जोडीने प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या जोडीचे अनेक चाहते आहेत. या मालिकेतील अभिनेते दिलीप जोशी यांनी दिशा वाकानी विषयी मौन सोडले आहे.
प्रेयसीची हत्या करून त्याच दिवशी दुसऱ्या मुलीशी केले लग्न; दिल्लीमध्ये
दिलीप जोशी म्हणाले की, हा निर्णय पूर्णपणे निर्मात्यांवर आहे. मालिकेत कोणता नवा चेहरा आणायचा की नाही हे तेच ठरवतील. पण कलाकार म्हणून मला दया ही भूमिका आजही डोळ्यासमोरून जात नाही. दया व जेठालाल या पात्रांनी रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.
भारतीय खेळाडू फीट राहण्यासाठी इंजेक्शन घेतात? निवड समितीच्या
तसेच, दया ज्या दिवशी मालिका सोडून गेली त्या दिवसापासून विनोदी भाग कमी झाले. पण आम्ही कायमच सकारात्मक राहिलो. त्यामुळे पुढे दया मालिकेत एन्ट्री करणार का? यावर आजही प्रश्नचिन्ह आहे. अभिनेत्री दिशा वाकानी हिने तिच्या गरोदरपणामुळे सुट्टी घेतली होती. पण पाच वर्षे उलटून गेली तरीही ती मालिकेत परतली नाही.