
मुंबई : देशातील पहिल्या वातानुकूलित डबल-डेकर इलेक्ट्रिक बससह दोन इलेक्ट्रिक बस गुरुवारी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. सिंगल-डेकर इलेक्ट्रिक बस आणि अॅप आधारित प्रीमियम बस सेवेसाठी डबल डेकर वातानुकूलित बस दक्षिण मुंबईतील NCPA येथे आयोजित कार्यक्रमात लॉन्च करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान कॉफी टेबल बुकसह दोन पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. मात्र, कार्यक्रमापूर्वी काळ्या आणि लाल रंगाच्या डबल डेकर बस आणि निळ्या रंगाच्या सिंगल डेकर बसचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शिवसेना नेते @AUThackeray यांच्या प्रयत्नातून मुंबईकरांच्या सेवेत नवीन इलेक्ट्रिक डबल डेकर बेस्ट बस दाखल होत आहे pic.twitter.com/hBzLLG5TEe
— Amit Pandit (@Shivsena_Amit) August 17, 2022
माहितीनुसार, या बसचे निर्माते गुरुवारी सकाळी दक्षिण मुंबईतील मंत्रालयाजवळील एका कार्यक्रमात त्यांचे अनावरण करतील. विविध टप्प्यात 900 इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले आहे. त्यापैकी 50 टक्के बसेस मार्च 2023 पर्यंत आणि उर्वरित 50 टक्के बसेस त्यानंतर येणे अपेक्षित आहे.