मुंबई : रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणी आरोप करण्यात आले होत. त्यावेळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बुधवारी रात्री सागर बंगल्यावरती भेट घेतली. रश्मी शुक्ला आणि फडणवीसांच्या या भेटीनंतर अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. या भेटीवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. आता या भेटीवरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील टीका केली आहे.
“सागर बंगल्यात वॉशिंग मशीनच काम चालतं असेल”, असा जोरदार टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. फोन टॅपिंग प्रकरणी आज मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्शवभूमीवर रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.
शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिला यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याअगोदर फोन टॅपिंग करण्यात येत असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.