हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने सादर केलेल्या अहवालामुळे गौतमी अदानी ( Gautam Adani) चांगलेच अडचणीत आले आहेत. ‘अदानी कॉर्पोरेट इतिहासातला सर्वांत मोठा घोटाळा करत आहेत’ असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत अदानी यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बॉयफ्रेंड रुसला म्हणुन तिने लिहिले पत्र; म्हणाली, “लव्ह यू माझा कबुतर, जानू, फौजी, टमाटर रसगुल्ला…”
या अहवालामुळे अदानी समुहाची झोप उडाली होती. याप्रकरणी गौतम अदानी यांना आता दिलासा मिळाला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालात असलेला उल्लेख मॉरीशसने फेटाळला आहे. यामुळे अदानी समूहाला मॉरीशसकडून क्लीन चिट मिळाली आहे. मॉरिशसच्या नियामक वित्तीय सेवा आयोगाने म्हंटले आहे की, “अदानी समूहाशी संबंधित 38 कंपन्या आणि 11 समूह फंडांमध्ये कायद्याचे उल्लंघन आढळले नाही.”
कसबा चिंचवड निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची; आमदार गिरीश बापट आजारी असूनही प्रचारासाठी मैदानात
अब्जाधीश गौतम अदानी यांनी त्यांच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये फेरफार करण्यासाठी मॉरिशसस्थित शेल कंपन्यांचा वापर केला आहे असा दावा अमेरिकन रिसर्च संस्था हिंडेनबर्गने ( Hindenburg) काही दिवसांपूर्वी दावा केला होता. यामुळे अदानी अडचणीत आले होते.
बिग ब्रेकिंग! स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात; राजकीय नेत्यासोबत थाटला संसार
परंतु, मॉरिशसच्या वित्तीय सेवा आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनेश्वरनाथ विकास ठाकूर यांनी मॉरिशसमधील अदानी समूहाशी संबंधित सर्व युनिट्सकडून मिळालेल्या प्राथमिक मूल्यांकनाच्या आणि माहितीच्या आधारे अदानींकडून कायद्याचे उल्लंघन झाले नसल्याचे सांगितले आहे.