बागेश्वर बाबा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मोठ्या वादात अडकून देखील बागेश्वर बाबांकडे जाणाऱ्या भाविकांचा ओघ कमी झालेला नाही. मध्य प्रदेशातील छतरपूरमधील बागेश्वर धाममध्ये (Bageshwar Dham) मोठ्या संख्येने लोक गाऱ्हाने घेऊन पोहोचतात. दरम्यान याठिकाणी एका आजारी महिलेचा मृत्यु झाला आहे.
गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेता आक्रमक
उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथील महिला नीलम देवी बागेश्वर बाबांना भेटायला आल्या होत्या. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या महीलेला बागेश्वर बाबा बरे करतील असे सांगण्यात आले होते. यासाठी नीलम देवी व त्यांचे पती दररोज बागेश्वर बाबांची ( Bageshwar Baba) परिक्रमा करत होते.
देवंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला गिरीश बापट यांचा भावनिक व्हिडीओ; पाहा VIDEO
मात्र अध्येमध्ये त्यांची तब्येत बिघडत होती. परंतु, संन्यासी बागेश्वर बाबा नेहमी त्यांना बरे करत होते. त्या आरामात जेवत व फिरत होत्या. मात्र काल अचानक नीलम देवी यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यु झाला. या पार्श्वभूमीवर नीलम देवी यांचे पती व नातेवाईकांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
या घटनेने बागेश्वर बाबांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिवसेंदिवस बागेश्वर बाबा देशभरात लोकप्रिय होत आहेत. अनेक भाविक आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी बागेश्वर बाबांची भेट घेतात. जादूटोण्याच्या नावाखाली दिशाभूल करत असल्याचा आरोप सध्या बागेश्वर बाबा यांच्यावर केला जातोय.
शिंदे व ठाकरे गटाची धडधड वाढली! थोड्याच वेळात सत्तासंघर्षावर निकाल