शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ मार्गावर मिळणार टोलमाफी

Big decision of the government in the background of Shiv Jayanti! Toll exemption will be available on 'this' route

शिवजयंती हा महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी मोठा उत्सव असतो. यानिमित्त जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारीला अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसनेरीकडे (shivneri) जाणाऱ्या तिन्ही टोलनाक्यांवर शिवजयंती (Shivjayanti 2023) निमित्त वाहनांना टोल न आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मोठी बातमी! बागेश्वर बाबाच्या दरबारात महिलेचा मृत्यू

दरम्यान खालापूर, खेड, राजगुरु नगर येथील टोल नाक्यांवरुन जाणाऱ्या वाहनांना शिवजयंतीच्या दिवशी सरकार कडून टोलमाफी (Free Toll) देण्यात आली आहे. खास शिवजयंतीच्या निमित्ताने सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी शासनाकडून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यामुळे शिवभक्ती जास्त संख्येने शिवनेरीवर जमणार आहेत. यासाठी राज्य सरकारने (State Government) शिवभक्तांसाठी हा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग! ठाकरे गटासाठी धक्कादायक बातमी; प्रकरण ७ सदस्यीय खडपीठापुढं जाणार नाही

महत्त्वाची बाब म्हणजे शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 18 फेब्रुवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते 19 फेब्रुवारी 2023 रोजी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शिवनेरी किल्ला व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त व त्यांच्या वाहनांची गर्दी होणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जुन्नर शहर व परिसरामध्ये वाहतुकीत बदल करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेता आक्रमक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *