केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण पक्षचिन्ह यावर आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला आहे. यामुळे मागील 60 वर्षांपासून शिवसेना व ठाकरे हे नाते आता संपुष्टात आले आहे. आता निवडणूक आयोगाचा हा अनपेक्षित निर्णय होताच उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.
कोंबड्यांने घेतला मालकाच जीव; तडफडत तडफडत मालकने सोडले प्राण
उद्धव ठाकरे ८.३० वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संजय राऊत संतापले; म्हणाले,”हे कोणाचेतरी गुलाम…”
ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया –
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना राऊत म्हणाले की, निवडणूक ‘सत्यमेव जयते’ ऐवजी आता ‘असत्यमेव जयते’ असे करावे लागणार आहे. खोक्यांचा वापर कुठंपर्यंत झालाय हे या प्रकरणातून दिसून येत आहे. पाण्यासारखा पैसा वाहिला आणि हा पैसा कुठं गेला हे लोकांनी पाहिला आहे. शिवसेना प्रमुख व शिवसैनिकांच्या त्यागातून शिवसेना पक्ष उभा झाला होता. तो पक्ष 40 बाजारबुणगे पक्ष विकत घेतात याची नोंद होणार आहे.
WhatsApp ने केले ‘हे’ ३ नवीन धमाकेदार फीचर्स लाँच; चॅटिंगची मजा होणार दुप्पट
यावेळी संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला देखील धारेवर धरले आहे. निवडणूक आयोगाने ( Election commission) आता लोकांचा विश्वासही गमावला आहे. स्वार्थापोटी स्वायत्त संस्था कशा प्रकारे संपवल्या जात आहे, हे दिसून येत आहे. निवडणूक आयोग असेल किंवा मग तपास यंत्रणा असेल हे कोणाचेतरी गुलाम असल्यासारखं वागत आहे. असे म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य!