केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण पक्षचिन्ह यावर आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला आहे. यामुळे मागील 60 वर्षांपासून शिवसेना व ठाकरे हे नाते आता संपुष्टात आले आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या अनपेक्षित निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
‘पैसा मिळेल पण नाव गेले..’ राज ठाकरे यांनी व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंना डिवचल
शरद पवार म्हणाले, “एकदा निकाल लागल्यानंतर चर्चा करता येत नाही. त्यामुळे जो निकाल लागला आहे तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा काही परीणाम होत नसतो. लोक नवीन चिन्ह स्वीकार करतील.” अशा शब्दांत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर चिन्ह गेल्याने काही फरक पडत नाही असं देखील यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.
निवडणूक आगोयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “चोर कधीही…”
दरम्यान, एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी काही महिन्यांपूर्वी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर ही लढाई सुरु होती. आता यावर निर्णय झाला असून इथून पुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष आता शिंदेंच्या हातात गेला आहे.
शिवसेना व धनुष्यबाण मिळताच एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आज सत्याचा…”