शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) स्थापन झाले आणि शिवसेनेचे (Shivsena) दोन गट पडले. यादरम्यान शिवसेना कोणाची? आणि धनुष्याबाण कोणाचा? हे मोठे प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. यावर नुकताच निवडणूक आयोगाने महत्व पुर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला आहे. यामुळे मागील 60 वर्षांपासून शिवसेना व ठाकरे हे नाते आता संपुष्टात आले आहे. आता या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
शिंदे गटाला शिवसेना व धनुष्यबाण मिळताच देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. शिवसैनिकांनी अजिबात खचून जाऊ नये. मी मैदानात उतरलो आहे आणि विजय मिळूनच थांबणार. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांना शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरावा लागतो , शिवसेना हे नाव चोरावा लागते त्यांना एवढंच नाही तर शिवसेनेचे धनुष्यबाण चोरावा लागत आहे, असे चोर कधीही मतदारांकडे जाऊ शकत नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“…त्याचा काही परीणाम होत नसतो”, निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरे फक्त आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायेत. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा आहेत. असं ते म्हणाले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “आम्हाला कोणीतरी चोर म्हणालं. म्हणजे आम्ही ५० आमदार चोर १३ खासदार चोर, नगरसेवक चोर, कार्यकर्ते शिवसैनिक चोर. म्हणजे थोडक्यात तुम्ही लाखो लोकांना चोर ठरवतायेत. कधीतरी स्वतःच आत्मपरीक्षण करा?” असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.
‘पैसा मिळेल पण नाव गेले..’ राज ठाकरे यांनी व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंना डिवचल