अनेक काळापासून रखडलेली पोलीस भरती आता कुठे मार्गी लागत होती. इतक्यात पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. पुणे पोलीस दलातील भरती स्थगित करण्यात आली आहे. कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
पुण्यात ( Pune) शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात 3 जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु, पोलीस मुख्यालयाच्या उपयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा चिंचवड पोटनिवडणुकीमुळे येत्या 18 ते 27 फेब्रुवारी दरम्यान पोलीस भरती ( Police recruitment 2023) स्थगित करण्यात आली आहे.
मोठी बातमी! ‘मिर्झापुर’ फेम शाहनवाज प्रधान यांचे निधन
पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु, पोटनिवडणुकीमुळे ही भरती स्थगित केली गेली आहे. पोलीस भरतीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत. याशिवाय शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुद्धा सुरु होत्या.
येत्या 26 फेब्रुवारीला पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. तर 2 मार्च 2023 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत प्रमुख पक्षांमध्ये चांगलीच लढत लागली आहे.