अनेक मोठे मोठे सेलेब्रिटी बऱ्याचदा त्यांच्या चाहत्यांमुळे अडचणीत येतात. भारताचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Pruthvi Shaw) देखील त्याच्या चाहत्यांमुळे अडचणीत आला आहे. सेल्फी देण्यास नकार दिल्याने त्याच्याशी काही चाहत्यांनी हुज्जत घातली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत गेले असून या प्रकरणी एकूण 8 जणांविरुद्ध एफआरआय नोंदवला गेला आहे. तसेच सपना गिल नावाच्या तरुणीला अटक देखील करण्यात आली होती.
पोलीस भरतीबाबत समोर आली मोठी अपडेट! वाचा सविस्तर
आता याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. न्यायालयाने आरोपी सपना गिलला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध एफआयआर देखील दाखल केला होता.
शिवसेना भवन कोणाचं? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटर पृथ्वी शॉने सेल्फी ( Selfi) घेण्यास नकार दिल्यामुळे त्याचा आपल्या चाहत्यांसोबत वाद झाला. या वादातून टोळक्यांनी पृथ्वी शॉच्या मित्राच्या कारची तोडफोड केली. एवढंच नाही तर पृथ्वी शॉशी हुज्जत घातली. यावेळी त्याला मारण्याचाही प्रयत्न केला गेला.
‘या’ नावाने उद्धव ठाकरेंनी पक्ष काढावा, शिंदे गटाच्या मंत्र्याने दिला सल्ला