Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी पोहोचले सीबीआय! ट्विट करून दिली माहिती

CBI reached Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia's house! The information was tweeted

दिल्ली : आज सकाळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरी सीबीआयचे (CBI) पथक पोहोचले. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट केले आहे. मनीष सिसोदिया यांनी सुमारे तीन ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली असून, त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मनीष सिसोदिया यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटले आहे की, दिल्ली सरकारला शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात चांगले काम करण्यापासून रोखले जात आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण २१ ठिकाणी सीबीआयचे छापे टाकण्यात येत आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे अनेक अधिकारी आणि दारू व्यावसायिकांच्या ठिकाणी हे छापे पडत आहेत. अबकारी धोरणासंदर्भात सुरू असलेल्या या छाप्यात मनीष सिसोदिया व्यतिरिक्त 3 लोकसेवक आणि इतरांचा सहभाग आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयच्या या छाप्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, ज्या परदेशी वृत्तपत्रात दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेचे कौतुक केले आहे, त्याच दिवशी ही सीबीआय दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापे टाकत आहे.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे ट्विट्स –

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *