मागच्या काही दिवसापासून राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान (Rakhi Sawant and her husband Adil Khan) त्यांच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आले आहेत. अभिनेत्री राखीने तिच्या पती विरोधात एफ फायर दाखल केली आहे. राखीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आदिलला अटक केले आहे. यादरम्यान आता राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे आभार मानले आहे.
‘शिवरायांच्या महान कार्याचा अभिमान बाळगायचा असेल तर…’ किरण मानेंची
यापूर्वीच राखीने आदिल त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले होते. नुकतंच आता राखीने मोठे वक्तव्य केले आहे. ती म्हणाली, आदिल मुस्लिम आहे. पण याचा अर्थ असा नाही की, तो चार वेळा लग्न करेल. आता चौथ्या लग्नासाठी आदिलला मुस्लिम धर्मातून मान्यता मिळणार नाही.
तसेच, तिहेरी तलाक कायद्यासाठी (Triple Talaq Act) खरोखरंच पंतप्रधान मोदी यांचे खूप खूप आभार. मला कधीच वाटलं नव्हतं की, हा कायदा माझ्यासाठी उपयोगी ठरेल. त्यामुळे माझ्यासह मुस्लिम महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहोत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची जीएसटी बाबत मोठी घोषणा! जीएसटी
दरम्यान, राखीच्या आईच्या निधनानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंतने आदिलवर मारहाण केल्याचे आणि पैसे लुटल्याचे आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली. तसेच आदिल तूरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड तनूसोबत लग्न करणार असल्याचे राखीने सांगितले आहे.