केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षात मोठे महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय येताच शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं ब्ल्यू टिक गेले आहे. या हँडलवर क्लिक केले की, सध्या रॉक अँड रोल असे नाव दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईट सुद्धा बंद पडली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
युवा शेतकऱ्याची कौतुकास्पद कामगिरी! गव्हाच्या पिकातून साकारली ‘शिवप्रतिमा’
निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या आहेत. दरम्यान शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा भाग म्हणून शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं नाव ShivSenaUBT_ असे ठेवण्यात आले आहे. शिवसेना कम्युनिकेशन या हँडलचे ब्ल्यू टिक गेले असून या हँडलचे नाव आता ShivsenaUBTComm असे ठेवण्यात आले आहे.
“…म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज”, काय म्हणाले उदयनराजे भोसले?
एवढंच नाही तर ठाकरे गटाने आता वेबसाईटबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्या शिवसेनेची वेबसाईट बंद असल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे आगामी काळात ठाकरे गटाच्या वेबसाईटच्या नावातसुद्धा बदल होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ठाकरे गटाचा शिवसेना या नावावरील दावा संपुष्टात आला असल्याने ठाकरे गटाने वेगाने पाऊले उचलली आहेत.
“त्यांनी जनाची नाही मनाची तरी ठेवावी”; अजित पवारांनी भाजपला धारेवर धरले