काल राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. दरम्यान लाल किल्ल्यावर दिवाण-ए-आममध्ये शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( Eknath Shinde) या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी भाषण करताना त्यांनी जाहीर केले की, इथून पुढे दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावरच साजरी करण्यात येणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल
ज्या लाल किल्ल्यामध्ये औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करुन नजरकैदेत टाकले होते. ज्या दिवाण-ए-खास मध्ये शिवछत्रपतींना बोलावून त्यांचा अपमान करण्यात आला, त्याच ठिकाणी शिवजयंतीचा ( Shivjayanti 2023) हा सोहळा साजरा होणे. हा माझ्या आयुष्यातील रोमांचकारी क्षण आहे. आज बदला घ्यायची संधी मिळाली. अनेक शिवभक्त या ठिकाणी आले असून ही शिवजयंती सोनेरी अक्षरात लिहिली जाईल. असे उद्गार एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.
बनावट नोटा ओळखा आता चक्क मोबाईलवर! करा ‘या’ अँप्सचा वापर
छत्रपतींचे कार्य कोणालाच विसरता येणार नाही. त्यांचे मॅनेजमेंट काय होते, ते गड-किल्ल्यांवर गेल्यावर कळते. छत्रपती शिवाजी महाराज ही एक दैवीशक्ती आहे. त्याकाळी काय परिस्थिती असेल हा विचार करुन आजही अंगावर काटा येतो. खरंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जात आहे. यापुढे दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावर साजरी केली जाईल. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.
पोलीस भरतीमध्ये धावता धावता तरुणाचा मृत्यु! वयाच्या 26 व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास