सध्याची तरुण पिढी शिकून देखील नोकऱ्या मिळत नाहीत. यामुळे तरुणपिढी व्यवसाय करण्याकडे वळत आहे. तरुण मुले वेगवेगळ्या आयडिया लावून स्वतःचा व्यवसाय चालू करत आहे. यामध्ये एमबीए चायवाला (Mba Chai Wala) या नावाने प्रसिद्ध असलेला प्रफुल्ल बिलोरे हा देखील आता एक प्रसिद्ध व्यक्ती बनला आहे.
पंकजा मुंडेंचा उद्धव ठाकरेंना फोन! राजकीय वर्तुळात रंगल्या नव्या चर्चा
2017 मध्ये या प्रफुलने स्वतःचा चहा स्टँड उघडण्याचा निर्णय घेतला आणि तो उघडला सुद्धा. यांनतर एमबीए चायवाला (Mba Chai Wala) या नावाने प्रसिद्ध असलेला प्रफुल्ल बिलोरे (Praful Bilore) याची सोशल मीडियावर कायम चर्चा होऊ लागली. आता तो एवढा यशस्वी झाला आहे की ‘एमबीए चा वाला’ हे ब्रँड नाव बनले आहे
दरवर्षी शिवजयंती लाल किल्ल्यावरच होणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
सध्या प्रफुल्ल बिलोरे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. याच कारण असं की, प्रफुल्ल ने नुकतीच 90 लाख रुपयांची मर्सिडीज खरेदी केली आहे. याबाबतचा त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ (viral video) शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.