व्हॉट्सअॅप (WhatsApp) युजरसाठी आनंदाची बातमी (news) समोर आली आहे. सोशल मीडियामध्ये (Social Media) सर्वात कोणते लोकप्रिय माध्यम असेल तर ते व्हाट्सॲप आहे. त्यामुळे फेसबुकच्या (Facebook) मालकीचे असलेले व्हाट्सॲप वापरणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्या युजरला व्हाट्सॲप वापरताना अनेक सुविधा मिळाव्यात म्हणून व्हाट्सॲप नवनवीन हटके आणि धमाकेदार फीचर्स (Features) आणत आहे.
MBA चहावाल्याने घेतली 90 लाखांची मर्सिडीज; पाहा VIDEO
लोकांना दोन व्हॉट्सअॅप अकाउंट ओपन करण्यासाठी दोन वेगवेगळे नंबर लागतात. मात्र आता दोन वेगेवेगळे नंबर घेण्याची गरज नाही. आता कंपनीने असे फिचर लाँच केले आहे की, एकाच नंबरवरुन आता तुम्हाला दोन व्हॉट्सअॅप सुरु करता येणार आहेत. मात्र अजूनही याबाबत लोकांना माहिती नाही.
Vivo, Huawei, Samsung, Oppo, Xiaomi, OnePlus, Realme या फोनमध्ये ड्युएल अॅप सपोर्ट असतो त्यामुळे तुम्हाला एकाच फोनमध्ये दोन समान अॅप्स चालवता येऊ शकतात. ते कसं याबाबत जाणून घेऊया… पहिल्यांदा तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये जा. नंतर अॅप्सवर जावे लागेल.ज्यावेळी अॅप्सवर क्लिक कराल त्यावेळी ड्युएल अॅप्सचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला क्रिएटवर क्लिक करून ड्युएल अॅप्स सपोर्टेड अॅप्समधून व्हॉट्सअॅप निवडा. यांनतर ड्युएल अॅप्सच्या पुढे टॅप करून थोड्या वेळ थांबा. त्यांनतर मग तुम्हाला अॅप लाँचवर जावे लागेल. यांनतर ड्युएल आयकॉन व्हॉट्सअॅपवर जाऊन तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकता.
पंकजा मुंडेंचा उद्धव ठाकरेंना फोन! राजकीय वर्तुळात रंगल्या नव्या चर्चा