नोव्हेंबर 2019 मधला ‘तो’ पहाटेचा शपथविधी! त्या शपथविधीने राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ. त्यानंतर भाजपला बसलेला धक्का आणि महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अवघा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. दरम्यान ‘तो’ पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. यांनतर आता भगतसिंग कोश्यारी यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ठाकरे गटाला दिलासा नाहीच! तातडीनं सुनावणीस करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार
कोश्यारी म्हणाले, माझ्याकडे दोन पक्षाचे नेते आले होते त्यावेळी त्यांना मी म्हणालो जर तुमच्याकडे बहुमत असेल तर ते सिद्ध करा त्यानंतर एका पक्षाच्या नेत्याने आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं आणि त्यांनतर शपथविधी झाला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली.
व्हॉट्सअॅपने आणले भन्नाट फिचर! नंबरच एकच मात्र चालवता येणार दोन WhatsApp
त्याचबरोबर पुढे कोर्टामध्ये जेव्हा आव्हान देण्यात आलं त्यावेळी त्यांनी माघार घेत राजीनामा दिला. शपथविधीसाठी राज्यपाल कधीही कोणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात ते बोलवत असतात. मी ज्यांना शपथ दिली त्यांनी याबाबतचं सत्य सांगितलं आहे. असं भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहे.
ठाकरेंना अजून एक मोठा धक्का! नाव आणि चिन्हानंतर आता कार्यालयही…