
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी पहाटेचा शपथविधी हा विषय चांगलाच चर्चेत आला होता. फडणवीसांनी याबाबत गौप्यस्फोट केल्यामुळे पहाटेचा शपथविधी चांगलाच चर्चेत आला. त्यांनतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले याबाबत देखील निवडणूक आयोगाने निर्णय दिला. या दोन्ही प्रकरणावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. मात्र या दोन प्रकरणावर शरद पवार स्पष्टपणे काहीच बोलत नाहीत.
निळू फुले यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर; प्रसाद ओक करणार बायोपिकचं दिग्दर्शन
शरद पवार या दोन्ही प्रकरणावर स्पष्टपणे काहीच बोलत नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी या दोन्ही प्रकरणावर अजून स्पष्टपणे कोणतेच भाष्य केलेले नाही.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितला पुढचा प्लॅन; म्हणाले, “मशाल हे चिन्हं गेलं तरी…”
एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर देखील शरद पवार यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते “एकदा निकाल लागल्यानंतर चर्चा करता येत नाही. त्यामुळे जो निकाल लागला आहे तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा काही परीणाम होत नसतो. लोक नवीन चिन्ह स्वीकार करतील.” अशा शब्दांत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे आता शरद पवार या दोन प्रकरणावर स्पष्टपणे प्रतिक्रिया देत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.