ठाकरेंच्या फोन प्रकरणावर शेवटी पंकजा मुंडे बोलल्याच; म्हणाल्या, “ज्यांना आवडत नाही, तेच…”

Pankaja Munde finally spoke on Thackeray's phone case; Said, "those who don't like it..."

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव व धनुष्यबाण शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अनेक राजकीय नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे ( Pankja Munde) यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करताना एक मोठा खुलासा केला होता.

ऐश्वर्या रायने चक्क विमानाच्या टॉयलेट मध्ये पिले सिगारेट; जाब विचारताच शाहरुख खानचे नाव केले पुढे

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी आपण बोललो आहोत, मात्र काय बोललो याबाबत माध्यमांना सांगणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. मात्र त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. या फोन प्रकरणावरुन चर्चेला तोंड फुटल्यानंतर दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं हे त्यांनी सांगितलं नव्हतं. मात्र काल पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

मोठी बातमी! अदिलने कोर्टातच दिली राखीला धमकी; म्हणाला, “मी बाहेर आल्यावर…”

पंकजा मुंडे काल कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघात भाजपच्या प्रचारात सामिल झाल्या होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “कसबा मतदारसंघात प्रचार करताना लोकांनी खूप प्रतिसाद दिला हा प्रचार हेमंत रासने यांच्यासाठी करत होतो. मागच्या तीन भाजपच्या प्रचारासाठी दिवसांपासून मी पुण्यातच आहे. ज्यांना माझा प्रचार पाहावत नाही ते अशा प्रकारच्या अफवा पसरवतायेत. मी करत असलेला प्रचार ज्यांना आवडत नाही, तेच अशा प्रकारच्या बातम्या करत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे”.

पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचार करताना अजित पवार यांच्या रोड शोमध्ये गोंधळ; मविआ व शिंदे-भाजप गटाचे कार्यकर्ते समोरासमोर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *