चालू गाळप हंगाम संपायला आला आहे. यामुळे सगळीकडेच वेगात ऊसतोड सुरू आहे. दरम्यान ऊसतोड मजूर व यंत्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट करण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करून ऊसतोड मजूर व यंत्रचालक एकरी पाच ते सहा हजार घेत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी देखील ऊस तुटला जाईल की नाही? या भीतीपोटी पैसे देत आहेत.
आई श्रीदेवीच्या आठवणीत जान्हवी कपूर भावूक; फोटो शेअर करत म्हणाली…
मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहीला होता. यामुळे यंदाच्या हंगामात ऊस ( Sugarcan) वेळेत तुटावा यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे. राज्यातील बहुतेक कारखान्यांची अजून आडसाली ऊसतोडणी सुरू आहे. त्यामुळे पूर्व व सुरू हंगामातील ( Sugarcan Season) उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. या परिस्थितीत आपला ऊस शेतात पडून राहू नये. ही चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
बहुचर्चित ‘रौंदळ’चा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज
सातारा जिल्ह्यात ज्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढत आहे त्याच प्रमाणात जिल्ह्यातील कारखान्यांच्या संख्येत वाढ होत आहे. येथे सध्या १६ कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे. मात्र तरी सुद्धा ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने, उसाचे गाळप उरकणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. मार्चच्या अगोदर ऊस तुटून गेला की पीककर्ज नवेजुने करण्यास
शेतकऱ्यांना मदत होते. दरम्यान हे आर्थिक गणित बिघडू नये व ऊस लवकर कारखान्यात जावा यासाठी शेतकरी ऊस तोड कामगारांना वाढवून पैसे द्यायला देखील तयार आहेत.
“…त्यामुळे मला ट्रोल करणं थांबवा”; गौतमी पाटीलनं केलं भावनिक आवाहन