ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत राऊतांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप केला आहे.
श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आता माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे याबाबत निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. सध्या त्यांचे हे ट्विट खूप चर्चेत आहे.
संज्याची इतकी फाटली की आज आवाजाचा वोल्युम एकदम कमी झाला, कसलाही पुरावा न देता संज्याला वाटलं की त्याच्यावर हल्ला होणार आहे, कदाचित स्वप्नात आलं असावं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 21, 2023
संज्या तू लवकरच सामान्य लोकांकडून फटके खाणार, त्यासाठी वेगळी तयारी करावी लागणार नाही.
ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट; ऊस तुटला जाईल की नाही? या भीतीचा घेतला जातोय फायदा
निलेश राणे यांनी ट्विट करत लिहिले की, संज्याची इतकी फाटली की आज आवाजाचा वोल्युम एकदम कमी झाला, कसलाही पुरावा न देता संज्याला वाटलं की त्याच्यावर हल्ला होणार आहे, कदाचित स्वप्नात आलं असावं. संज्या तू लवकरच सामान्य लोकांकडून फटके खाणार, त्यासाठी वेगळी तयारी करावी लागणार नाही.