हिडेंनबर्गच्या अहवालानंतर आदनींना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. दरम्यान आता देखील आदनींना एक मोठा धक्का बसला आहे. सीके बिर्ला समूहाची कंपनी ओरिएंट सिमेंटने अदानी पॉवर महाराष्ट्रसोबतचा करार नुकताच रद्द करून टाकला आहे. करारासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी अदानी समूह अपयशी ठरला असे ओरिएंट समूहाचे म्हणणे आहे.
पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत, फडणवीसांनी शरद पवारांना दिलं आणखी एक आव्हान, म्हणाले…
ओरिएंट सिमेंटने २०२१ मध्ये अदानी समूहासोबत ( Orient Cement & Adani Group) सामंजस्य कराराची घोषणा केली होती. तिरोडा येथे सिमेंट ग्राइडिंग युनिट स्थापन करण्यासाठी हा करार करण्यात आला होता. इतकंच नाही तर ओरिएंट सिमेंटने यासाठी 35 एकर जमीन सुद्धा पाहून ठेवली होती. मात्र या प्लांटसाठी एमआयडीसी कडून आवश्यक मंजुरी मिळवण्यात अदानी अपयशी ठरले. तसेच कराराची कालमर्यादा देखील संपून गेली आहे. यामुळे हा करार रद्द करण्यात आला आहे.
सामानासह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत…; उर्फीने सांगितला ‘तो’ किस्सा
हिडेंनबर्ग च्या अहवालानंतर ( Hindenburg Report) अदानी समूहाला बसलेला हा तिसरा धक्का आहे. याआधी त्यांनी डीबी पॉवर खरेदीचा करार पूर्ण केला नाही. तसेच नंतर पीटीसी इंडियासाठी बोली लावण्यापासून अदानी मागे हटले. अदानी समूह सध्या रोख बचत आणि कर्ज कमी करण्यावर लक्ष देत आहे. यामुळे अदानी समूहाने या दोन्ही संधी हातातून सोडल्या असल्याचे म्हंटले जात आहे.