बीड : इंदुरीकर (Indurikar) महाराज हे त्यांच्या कीर्तन क्षेत्रात अग्रेसर आहेत. परंतु त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. अनेकदा तर इंदुरिकार महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशीच एक घटना काल बीड (Beed) येथे घडली आहे. काल बीड येथील कळसंबर गावात इंदुरिकर महाराजांचे कीर्तन होते. परंतु महाराजांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कीर्तन करण्यासाठी कळसंबर गावात येऊ शकले नाही. यावेळी ग्रामस्थ महाराजांवर संतप्त झाले आणि त्यांनी महाराजांवर फसवणुकीची तक्रार दाखल करण्याची मागणी केली.
पुढे ग्रामस्थांनी आपापसात चर्चा करून तक्रार दाखल करण्याचा विचार मागे घेतला. ग्रामस्थांनी अस सांगितल की, जर इंदुरीकर महाराज कळसंबरगावात येण्या एवजी दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या ठिकाणी आजच कीर्तन केले तर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. कालच नाही तर अनेक वेळा इंदुरीकर महाराज वादात सापडले आहेत.ते म्हणजे याआधीही इंदुरीकर महाराजांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं.या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम २२ चं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.