मुंबईमध्ये राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयबाहेर मागच्या चार पाच दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री म्हंणून बॅनर लागले होते. ही गोष्ट जुनी होत नाही तोपर्यंत लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं देखील बॅनर मुंबईमध्ये लावण्यात आले. आता यावरून सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
अदानी समूहाला तिसरा मोठा धक्का; ‘या’ बड्या कंपनीने केला करार रद्द!
एका महिलेचा फोटो परवानगीशिवाय पोस्टरवर लावण्याचा कोणालाच अधिकार नाही. मी मुंबई पोलिसांना विनंती करते पोस्टर लावणाऱ्याचा शोध घ्यावा आणि मला न्याय मिळून द्यावा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. पण हे पोस्टर लावताच लगेचच लगेचच पोलिसांनी हे पोस्टर काढल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असं या बॅनरवर लिहिण्यात आले होते.
अभिनेत्री रवीना टंडनवर आली फरशी पुसायची वेळ; समोर आला धक्कदायक व्हिडीओ