राज्यभरात सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा ( HSC exam) सुरू आहेत. दरम्यान परभणी (Parbhani) मधील एका परीक्षा केंद्रावरील घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येथे एका आईने चक्क आपल्या तान्ह्या लेकराला बाहेर ठेऊन बारावीची परीक्षा दिली आहे.
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल! कसबा, चिंचवड पोटणीवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले गंभीर आरोप
शाळेबाहेर एका झाडाला झोळी बांधत या आईने आपल्या मुलाला झोळीत ठेवले. यानंतर तीन तास तिने आपला पेपर दिला. तीन तास लेकराला झोळीत ठेऊन जिद्दीने परीक्षा देणाऱ्या या आईचे सर्वच स्तरांतून कौतुक केले जात आहे. पेपर सुरु असताना बाळाकडे लक्ष ठेवण्यासाठी या महिलेचे पती देखील उपस्थित होते.
शेळ्या मेंढ्यांच्या मागे फिरणाऱ्या 80 वर्षाच्या आजींनी विठुरायाच्या चरणी अर्पण केले चक्क लाखो रुपये!
पूनम माधव इंगोले असे या महिलेचे नाव असून ती परभणी जिल्ह्यातील आहे. सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथील परीक्षा केंद्रावर पुनमचा नंबर आल्याने तिला आपले सात महिन्यांचे बाळ आणि पतीसह परीक्षा केंद्रावर जावे लागले. दरम्यान या जोडप्याचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.
यंदाची बारावीची परीक्षा विविध कारणांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. कॉपीमुक्त परिक्षेसाठी बोर्डाकडून उचललेली ठोस पाऊले, पेपरमध्ये झालेले घोळ व विद्यार्थिनींची धक्कादायक तपासणी यामुळे ही परीक्षा चर्चेत आली आहे.