अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील राहता या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम (Gautami Patil Program) आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमामध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. गौतमीचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घातला यावेळी त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल! कसबा, चिंचवड पोटणीवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले गंभीर आरोप
तरूणांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज (Police baton charge) सुरू केल्यांनतर कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. या गोंधळांनंतर पोलीस बंदोबस्तात गौतमीला पाटीलला कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढण्यात आले.
आईच्या जिद्दीला सलाम! तान्ह्या बाळाला झोळीत टाकून तिने दिला बारावीचा पेपर
त्याच झालं असं की, गौतमीचा डान्स चालू असताना काही तरुणांनी पैसे उधळले. नंतर यावरूनच मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु झाला. या गोंधळामुळे गौतमीने डान्स थांबवला. त्याचबरोबर डान्स थांबवण्यामुळे गोंधळ आणखी वाढला आणि प्रेक्षकांनी कार्यक्रमस्थळी राडा घालण्यास सुरुवात केली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
शेळ्या मेंढ्यांच्या मागे फिरणाऱ्या 80 वर्षाच्या आजींनी विठुरायाच्या चरणी अर्पण केले चक्क लाखो रुपये!