
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सुरू असलेल्या या चौकशीमध्ये अपघाताचे एक कारण समजले आहे. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी (१४ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातण बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. या अपघातात मेटे यांच्या गाडीचा चक्काचूर झाला.
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू बाबत दररोज वेगवेगळी माहिती समोर येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हे प्रकरण cid कडे सोपवल आहे. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत सकाळी लवकर पोहोचावे म्हणून मेटेंच्या कारचा ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी गाडीचा वेग वाढवला.आणि त्यामुळे मेटेंचा प्रवास झटपट झाला. मेटेंच्या कारने एका मिनिटात साधारण १.१०४१ किमी एवढ्या वेगाने प्रवास केला. सुसाट वेग आणि वेगात असताना सुटलेले कारवरील नियंत्रण यातून अपघात झाल्याचा संशय चौकशीतून व्यक्त होत आहे.
टोलप्लाझा ते अपघातस्थळापर्यंतचे १८ किमी अंतर हे नऊ मिनिटांत पार केले होते आणि याचवेळी हा अपघात झाला.या अपघातावेळी मेटे गाडीच्या मागच्या सीटवर झोपले होते आणि त्यांचा झोपेतच मृत्यू झाला.तर गाडीचा चालक कदम जखमी झाला आणि त्याच्या शेजारी असलेला मेटेंचा अंगरक्षक राम ढोबळे गंभीर जखमी झाला.