
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली होती. तेव्हापासुन ठाकरे गटाचे नेते शिंदे गटाच्या नेत्यांवर गद्दार म्हणून टीका करत आहेत. यामध्येच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दारी का केली याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
बिग ब्रेकिंग! नितीन गडकरींच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातला गोंधळ
याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केली. एकनाथ शिंदेसारखा (Eknath Shinde) चेहरा शिवसेनतून बाहेर जात होता म्हणून गद्दारी केल्याचे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत. ते जळगावमध्ये बोलत होते. त्याचबरोबर गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बोललो होतो की, एकनाथ शिंदे आपल्यापासून लांब जाता कामा नये. मात्र, यादरम्यान आम्ही उठाव केला आणि मराठा चेहरऱ्याच्या मागे उभे राहिल्याचे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत.
बॉलिवूडचे दोन मोठे ‘खान’ झळकणार एकाच चित्रपटात; चाहतेसुद्धा आहेत आनंदात
अजित पवारांच्या टिकेला दिले प्रत्युत्तर
उध्दव ठाकरे यांना सोडून शिवसेनेतून बाहेर पडलेला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली होती. आता या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, “जे सकाळी एका सोबत शपथ घेतात, दुपारी दुसऱ्यासोबत जातात आणि नंतर संध्याकाळी तिसऱ्यासोबत सरकार बनवतात त्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही”. असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आम्ही गद्दारी का केली? गुलाबराव पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…