रविंद्र धंगेकरांच्या आरोपानंतर फडणवीसांचं मोठ वक्तव्य; म्हणाले, “पैसे वाटणे ही संस्कृती काँग्रेस, राष्ट्रवादीची”

Fadnavis' big statement after Ravindra Dhangekar's accusation; Said, "Distributing money is the culture of Congress, NCP"

कसबा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. आता त्यांच्या या आरोपानंतर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आम्ही गद्दारी का केली? गुलाबराव पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही प्रचार केला तर कारवाई होते. म्हणून प्रचार करण्यासाठी अशा प्रकारचा राजकीय स्टंट केला जात आहे. ज्यावेळी पायाखालून वाळू निघून जाते, त्यावेळी असे स्टंट केले जातात”, असे फडणवीस म्हणाले आहेत.

“जे सकाळी एका सोबत शपथ घेतात, दुपारी दुसऱ्यासोबत जातात अन् संध्याकाळी…”, गुलाबराव पाटील यांची अजित पवारांवर बोचरी टीका

त्याचबरोबर फडणवीस पुढे म्हणाले, “ पैसे वाटणे ही संस्कृती भाजपची नसून ती संस्कृती काँग्रेस, राष्ट्रवादीची आहे. आमचा मतदार संघ असा नाही की पैसे घेऊन मतदान करेल. हे उपोषण भाजपच्या विरोधात नसून मतदारांच्या विरोधात आहे कारण तुम्ही मतदारांना विकावू ठरवत आहात, हे अतिशय चुकीचं आहे. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो” असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

बिग ब्रेकिंग! नितीन गडकरींच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *