
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. सध्या सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान आजारी असल्याचे दिसत आहे.
“ती दाढीपण जाळून टाकू”, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान
वांद्रे येथील क्लिनिकच्या बाहेर काल रात्री सलमान खान दिसला होता त्यावेळची त्याची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खानच्या चेहऱ्यावर दुःख आहे आणि वाढलेल्या दाढीमुळे तो खूप कोमेजलेला दिसत आहे. यामुळे सलमान खानचा हा अवतार पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आता यावर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, सलमान भाई सर्वांपेक्षा वेगळा तर दुसऱ्या युजरने लिहिले की, वाघ रस्त्याने चालत आहे. त्याचबरोबर सलमानचा लूक पाहून काही जण म्हणाले, माझा हिरो म्हातारा होत आहे. अशा अनेक वेगवगेळ्या कमेंट नेटकरी करत आहेत.