दुचाकी चालवत असताना अनेकदा रस्त्याच्या बाजूला भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे वाहन चालक गडबडून जातो. यामुळे अनेकदा अपघात देखील होतात. अशावेळी बऱ्याचदा कुत्रे चावूही शकतात. अशावेळी सतर्क राहून थोडी चलाखी दाखवली तर संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. यासाठी तुम्ही एक छोटीशी युक्ती वापरू शकता.
सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार? काँग्रेसच्या अधिवेशनात केली मोठी घोषणा
तुम्ही कधी निरीक्षण केले आहे का? जेव्हा तुम्ही अतिशय वेगाने दुचाकी चालवता तेव्हाच कुत्रे तुमच्यावर भुंकतात. नंतर ते दुचाकीचा पाठलाग करतात. मात्र दुसरीकडे, जेव्हाही तुम्ही मंद गतीने बाईक चालवत बाहेर जाता, तेव्हा कुत्री तुमच्यावर भुंकत नाहीत आणि तुमचा पाठलागही करत नाहीत.
धक्कादायक! पुण्यात ससून रुग्णालयामध्ये दोन गटांत कोयत्याने हाणामारी
याचा अर्थ असा होतो की, कुत्र्यांना पाहून तुम्ही जर तुमच्या बाईकचा वेग ( Bike Speed) कमी केला आणि हळूच तिथून निघून गेलात, तर कुत्रे ( Dog) तुमच्या बाईकवर भुंकणार नाहीत. अन्यथा ते तुमचा पाठलाग करतील.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया!
याशिवाय गरज वाटल्यास तुम्ही मोटारसायकलही थांबवू शकता. नंतर मग हळूहळू तुम्ही ते ठिकाण सोडू शकता. यामुळे तुम्ही घाबरणार नाहीत आणि अपघाताचा धोका ( Risk of Accident) सुद्धा अतिशय सहज टळून जाईल.
महाराष्ट्रात सत्तांतर करण्यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले; संजय राऊतांचा गौप्यस्फोट