मागच्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. यादरम्यान चिंचवड मतदार संघात माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
सुप्रिया सुळे यांनी केला मोठा दावा; म्हणाल्या, “पुणे मेट्रोच्या कामात तांत्रिक चुका”
ही घटना पिंपळ गुरव माध्यमिक विद्यालय मतदान केंद्राबाहेर घडली असून पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान कसबा मतदार संघात ९.३० पर्यंत ६.५ टक्के तर चिंचवड मतदार संघात ३.५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी चांगलीच ताकद लावली होती. त्यामुळे आज मतदार कोणाला मत देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“कोयत्याने डोक्यावर घाव करताना…”, एमसी स्टॅनने केला ‘त्या’ थरारक घटनेबद्दल मोठा खुलासा
कसब्यात दुहेरी लढत होत असून भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Raas) यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडणूक लढवत आहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत असून. अश्विनी जगतात तेथून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवतायेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.