मागच्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक तरूणी थेट लंडनहून पुण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सुप्रिया सुळे यांनी केला मोठा दावा; म्हणाल्या, “पुणे मेट्रोच्या कामात तांत्रिक चुका”
अमृता देवकर असं या तरुणीचं नाव आहे. मतदान हा आपला अधिकार आणि हक्क आहे.cत्यामुळे सगळ्यांनी मतदान केले पाहिजे, असं ही तरुणी म्हणाली आहे. त्यामुळे आता या तरूणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“कोयत्याने डोक्यावर घाव करताना…”, एमसी स्टॅनने केला ‘त्या’ थरारक घटनेबद्दल मोठा खुलासा
दरम्यान कसबा मतदार संघात ९.३० पर्यंत ६.५ टक्के तर चिंचवड मतदार संघात ३.५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी चांगलीच ताकद लावली होती. त्यामुळे आज मतदार कोणाला मत देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.