कर्जत-जामखेडचे (Karjat-Jamkhed) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे नेहमी जनतेसाठी कुठल्याही परिस्थितीत मदतीला धावून जातात. रोहित पवार यांची एक संवेदनशील, तत्पर व कृतिशील ‘लोकप्रतिनिधी ‘ म्हणून राज्यात ओळख आहे.
धक्कदायक! कार्यक्रमात गौतमी पाटील कपडे बदलताना तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; पोलिसात तक्रार दाखल
रोहित पवार निरनिराळ्या माध्यमातून आपत्तीच्या (disaster) निवारणासाठी काम करतात. सध्या कांद्याला भाव नसल्याने नाशिकमधील (Nashik) नैताळे (ता. निफाड) येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात ट्रॅक्टर फिरवून जनावरं सोडली आहेत. आता या शेतकऱ्याची आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी भेट घेतली आहे.
कमी मतदानावरुन संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुणेकर घरी बसतील…”
कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही म्हणून नाशिकमधील नैताळे येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात ट्रॅक्टर फिरवून जनावरं सोडली. कर्जतचे जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्या शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन भेट घेतली आणि चर्चा केली.