‘आता तरी प्रेक्षकांचा वनवास संपवा’, रंग माझा वेगळा मालिकेचा ‘तो’ प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या मालिकेमध्ये नवनवीन ट्वीस पाहायला मिळत आहे. दीपा (Deepa) आणि कार्तिकच्या (Karthik) आयुष्यातील सुरू असलेला संघर्षमय प्रवास प्रेक्षकांना जाणून घेण्याची खूपच उत्सुकता दिसूत येत आहे. अशातच आता मालिकेत नात्यांचा रंग बदलल्याचे पाहायला मिळत असून मोठा लीप येणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मोठा

मालिकेचा एक प्रोमो सध्या चर्चेत आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिपाने साक्षी प्रकरणाविषयी दिलेली साक्ष ऐकून कोर्टाने कार्तिकला १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. १४ वर्षींचा लिप या प्रोमोमध्ये दाखवण्यात आला आहे. पुन्हा एकदा कार्तिक आणि दिपा एकत्र येताना दिसत आहे. मात्र कार्तिकचे वागने पाहून पुन्हा मोठी ट्वीस येणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष मालिकेच्या पुढच्या भागाकडे लागले आहे.

मर्सिडीज कार पेक्षा महाग आहे ‘हा’ 50 लाख किंमतीचा बैल; तुम्हाला माहिती

यादरम्यान, मालिकेचा हा प्रोमो पाहून अनेक चाहते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहे. हा व्हिडिओ स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट्स करताना एका नेटकर्‍याने लिहीले की, दीपा आणि कार्तिक अमर रहे. याच वेळी दुसर्‍या नेटकर्‍याने लिहीले की, ‘इतका वनवास फक्त दीपा लाच का? आता तरी प्रेक्षकांचा वनवास संपवा, अशी कळकळीची विनंती काही जण करत आहेत. तसेच अनेक जण यावर प्रतिक्रिया देत आहेत.

गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणाची थेट राज्य महिला आयोगाने

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *