केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ( Shivsena) हे नाव व धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यानंतर शिंदे गटाने अंतर्गत पक्षबांधणीसाठी पाऊले उचलली आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामध्ये व्हीपचा मुद्दा चर्चेत आला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने किमान पुढचे दोन आठवडे तरी ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
मात्र अशातच शिवसेनेचे नेते भरत गोगावले ( Bharat Gogavle) यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, ” शिवसेनेच्या सर्व आमदारांना अधिवेशन काळात हजर राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. खरंतर सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करू नये, असं निर्देश दिले आहेत. मात्र अधिवेशनाला हजर राहणं ही कारवाई होत नाही. हा व्हीप आहे की सर्वांनी सभागृहात हजर राहावे.”
ह्रता दुर्गुळे ठरली ‘महाराष्ट्राची फेव्हरेट’; ट्रॉफी पाहून म्हणाली…
यावर उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते प्रतोद सुनील प्रभू यांनी मोठे विधान केले आहे. आमच्या उपस्थितीसंदर्भात आम्हीच व्हीप बजावणार आहोत. शिंदे गटाचे नेते आमच्यावर व्हीप बजावू शकत नाहीत. शिंदे गटाच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले की, ते कोणताही व्हीप बजावणार नाही. मग, न्यायालयाला सांगूनही व्हीप बजावत असतील, तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. त्यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे, असे आम्ही सांगू. न्यायदेवता आम्हाला नक्की न्याय देईल. असे सुनील प्रभु ( Sunil Prabhu) म्हणाले आहेत.
स्त्यावर पिचकाऱ्या मारणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल; सीसीटीव्हीची करडी नजर कायम