मुंबई : मुंबईच्या ट्रॅफिक पोलिस कंट्रोलच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एक धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये मुंबईत (mumbai) २६/११ सारखा हल्ला होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. यासोबतच इतर यंत्रणांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.दरम्यान, आता मुंबईत पोलीस सुरक्षा यंत्रण अलर्ट मोडवर आहे. मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मुंबई ट्रॅफिक पोलिस कंट्रोलच्या नंबरवर +923029858353 या क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर मॅसेज करण्यात आला आहे.
मेसेजमध्ये अस लिहिले आहे की, नशीब मुंबईत हल्ला होणार आहे. हा हल्ला २६/११ (26/11attack)ची आठवण करून देईल. यामध्ये आणखी काही मोबाईल क्रमांकही शेअर करण्यात आले आहेत. यूपी एटीएसला मुंबई उडवायची आहे, असे संदेशात लिहिले आहे. यात काही भारतीय माझ्यासोबत आहेत.यातील काहींची नावेही या मेसेजमध्ये(massage) शेअर करण्यात आली आहेत.माझा पत्ता इथे दाखवेल, पण मुंबईत स्फोट होईल, असे संदेशात लिहिले आहे.
Electricity price hike : 13 राज्यांना बसणार वीज दरवाढीचा फटका ; वाचा सविस्तर
दरम्यान ज्या मुख्य नंबरवरुन मेजेस मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला करण्यात आला होता, त्या नंबर संपर्ककेला असता फोन एका माणसानं उचलला होता. त्यानंतर त्याने फोन एका महिलेकडे बोलण्यास सोपवला. या महिलेकडे विचारणा केली असतील त्या महिलेने आपण कोलकातामधून बोलत असल्याची माहिती दिली. दरम्यान, आपण कोणताही मेसेज केलेला नाही, असा दावादेखील केला.