मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ ठाणे याला मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या बालेकिल्ल्यातून सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या शिवसेना उपविभाग प्रमुखाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सावधान! रस्त्यावर मोकाट जनावरे सोडल्यास भेटणार 5 हजार रुपयांचा दंड
रवींद्र परदेशी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना काल रात्री १०च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, फेरीवाल्यांच्या वादातून टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
सर्वसामान्यांना झटका! सणासुदीच्या मुहूर्तावर LPG सिलेंडरमध्ये झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ
रवींद्र परदेशी यांची नुकतीच शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. रवींद्र परदेशी यांच्यावर ठाण्यामधील जांभळी नाका येथील शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदाची जबाबदारी होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी हे काम आटपून चालले असता त्यांच्या वरदोघाजणांनी चाकूने हल्ला केला आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.