आजपासून मार्च महिन्याला सुरवात झाली आहे. मात्र तुमचे जर बँकेमध्ये काही काम असे तर ते लवकरात लवकर करून घ्या. कारण मार्च महिन्यामध्ये तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे बँकेतील सर्व कामे लवकरात लवकर आटपून घ्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून समोर आली धक्कादायक घटना; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
मार्च महिन्यामध्ये होळी आणि रामनवमी याचबरोबर अनेक सण आहेत. त्याशिवाय दुसरा-चौथा शनिवार आणि रविवार देखील बँका बंद असतात. अशा सर्व सुट्ट्या धरून १२ दिवस बँका बंद राहणार आहेत.
सर्वसामान्यांना झटका! सणासुदीच्या मुहूर्तावर LPG सिलेंडरमध्ये झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ
खालीलप्रमाणे असतील सुट्ट्या –
३ मार्च – चपचार कुट – यामध्ये मिझोराममध्ये बँका बंद राहतील
५ मार्च – रविवारी सुट्टी
७ मार्च – होळीनिमित्त बँका बंद राहतील
८ मार्च – होळी २रा दिवस यामुळे मिझोरम, मध्यप्रदेश, त्रिपुरा, गुजरात,सिक्कीम, राजस्थान, जम्मू, ओडिसा, चंदीगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बेंगा या ठिकाणी बँका बंद राहतील
९ मार्च – (होळी) – बिहारमध्ये बँका बंद राहतील
११ मार्च – दुसरा शनिवार सुट्टी
१२ मार्च – रविवार
१९ मार्च – रविवार
२२ मार्च – गुढी पाडवा यानिमित्ताने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मणिपूर, जम्मू, तामिळनाडू, तेलंगणा,बिहार आणि श्रीनगर या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
२५ मार्च – चौथा रविवार
२६ मार्च – रविवार
३० मार्च – श्री राम नवमी