शिंदे गटावर टीका करत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोर मंडळ असा केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सत्ताधारी पक्षाने यावर प्रतिक्रिया दिल्या आहेतच. मात्र आता मित्रपक्षातील नेते अजित पवार यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे.
गौतमी पाटीलनं मराठी नंतर गाजवलं पंजाबी मार्केट, ‘तेरा पता’ नवीन पंजाबी गाणं रिलीज; पाहा VIDEO
यावेळी ते म्हणाले आहेत की, विधीमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार कोणालाच नाही. कारण आजपर्यंत अनेक दिग्गजांनी विधीमंडळात ( Assembly) काम केले आहे. दरम्यान संजय राऊत खरंच विधिमंडळाला चोरमंडळ म्हणाले असतील, तर ते चुकीचे आहे.
पुण्यामध्ये प्राजक्ता माळीचा आहे ‘हा’ व्यवसाय; स्वतःच केला याबाबत मोठा खुलासा
विरोधक असतील किंवा सत्ताधारी कोणत्याही नेत्याने याचे समर्थन केलेलं नाही. संजय राऊत खरंच तसे बोलले असतील तर त्यांची चौकशी केली जावी. कारण या अशा वाक्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊच शकत नाही. अशी रोखठोक भूमिका अजित पवार ( Ajit Pawar) यांनी मांडली आहे.
दरम्यान या प्रकरणा संबंधित जो काही निर्णय असेल तो घेतला जावा. असे अजित पवारांनी म्हंटले असून यासाठी हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे जाईल असा अंदाज दिसतो आहे. याबाबत काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हक्कभंगाची मागणी होताच संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…