कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली असतांना कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhnagekar ) यांनी माझाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नेमका विजय कोणाचा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर; तिसऱ्या फेरीमध्ये किती मते? वाचा एका क्लीकवर
निकाल लागण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. याच्यापूर्वी रवींद्र धंगेकर यांनी हा दावा केला आहे. त्याचबरोबर धंगेकर म्हणाले की, ज्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी माझा विजय झाला होता. मात्र निवडणूक प्रक्रिया असल्याने सोपस्कार पार पाडावे लागले असे यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांनो ‘या’ कारणामुळे केळी काळी पडतात; जाणून घ्या वैज्ञानिक कारण
यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत पाहायला मिळत असून आता कसब्यातून रवींद्र धंगेकर की हेमंत रासने कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.