कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. कसबा पेठ निवडणुकीमध्ये हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
सहाव्या फेरीत अभिजीत बिचुकलेंना मिळाली ‘इतकी’ मत; आकडा पाहून व्हाल थक्क
रवींद्र धंगेकर हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर मात्र आता त्यांच्या आघाडीला ब्रेक लागला असून सातव्या फेरीमध्ये हेमंत रासने आघाडीवर आहेत. भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी सातव्या फेरीमध्ये ४ हजार २७० मतं घेतली आहेत. त्यामुळे आता निकाल नेमका कोणत्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“माझाच विजय होणार”, निकाल लागण्याच्या काही तासापूर्वीच रवींद्र धंगेकर यांचा मोठा दावा
धंगेकरांनी केला मोठा दावा –
कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली असतांना कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhnagekar) यांनी माझाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. निकाल लागण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. याच्यापूर्वी रवींद्र धंगेकर यांनी हा दावा केला आहे. त्याचबरोबर धंगेकर म्हणाले की, ज्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी माझा विजय झाला होता. मात्र निवडणूक प्रक्रिया असल्याने सोपस्कार पार पाडावे लागले असे यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर; तिसऱ्या फेरीमध्ये किती मते? वाचा एका क्लीकवर