मुंबई : आज जळगावात शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या शिवसंवाद यात्रेनिमित्त आले होते. शिवसांवद यात्रेचा त्यांचा चौथा टप्पा सुरू आहे.भर पावसात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांनी या सभेला उपस्थिती लावली होती. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे. यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) म्हणाले की,
राज्यातून शिवसेना संपवण्याचा कट रचण्यात आला असून आम्हाला एकटे पडण्याचं हे एक षडयंत्र आहे. पण मला राज्यातील जनतेला विचारायचं आहे, तुम्ही आम्हाला एकटे पडू द्याल का?’ असा सवाल त्यांनी जनतेला विचारलं. पुढे आदित्य ठाकरे घणाघाती हल्ला करताना म्हणाले की,गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं? बाबाजी का ठुल्लू..
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी झाली आणि गद्दार जरी बिकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे. जनतेला माहितीये की कोण विकास कामं करतं, खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं ते. देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे. सत्तामेव जयतेला नाही. त्यामुळे हे गद्दारांचं हे बेकायदेशीर सरकार लवकरचं कोसळणार म्हणजे कोसळणार. प्रत्येक गद्दाराच्या मतदारसंघात जाऊन गदाराबद्दल सांगणार म्हणजे सांगणार, असंही ते म्हणाले.
Mumbai : मुंबईत पुन्हा एकदा 26/11सारख्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता, ‘या’ नंबरवरून आला मेसेज
बंड करायला हिंमत लागते, गद्दारीला नाही
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की बंड करायला खरी हिम्मत लागते. यांनी गद्दारी केली. गुवाहाटीला गेले, तिकडे काय काय केलं आपण पाहिलं की . गुवाहातील गेल्यावर 40 गद्दार लोक स्वतःला शिवसैनिक समजत होते. मजा करत होते. पण तिथला पूर त्यांना दिसला नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.