मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे काल ( ता.3) मारहाण झाली होती. तीन ते चार जणांनी देशपांडे यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व खा. संजय राऊत ( Sanjay Raut) यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
देशातील पहिली कार कोणी खरेदी केली होती, हे तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर…
दरम्यान या हल्ल्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली असून मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हल्ल्यांची गांभीर्याने दाखल घेतली असून त्यांनी संदीप देशपांडे यांची चौकशी करत आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून या हल्ल्याची अगदी कसून चौकशी सुरू असून . मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणाबाबत माहिती दिली आहे.
राखी सावंतच्या आयुष्यावर येणार सिनेमा; चित्रपटाचे नाव वाचून तुमच्याही भुवया उंचावतील
‘संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून भांडूपमधून एका 56 वर्षांच्या व्यक्तीला देखील ताब्यात घेतलं गेलं. मात्र यामागे कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नसून याचा शोध सुरू आहे. पोलीस यंत्रणा याची चौकशी करत आहे,’ असं पोलीस म्हणाले.
“अन् तेव्हा श्रद्धा कपूरने नाकारली होती सलमान खानच्या सिनेमात काम करण्याची संधी”; वाचा खरे कारण