तुम्ही आतापर्यंत एखादी वस्तू विक्रीला निघाली आहे याबाबत बऱ्याचदा ऐकलं असेल. मात्र गाव विक्रीला निघालेलं कधी ऐकलं आहे का? आता तुम्ही म्हणताल गाव कसं विक्रीला निघू शकत. मात्र ही गोष्ट खरी आहे. सध्या एक गाव विक्रीला निघाले आहे. नाशिक जिल्हयातील देवळा तालुक्यात (In Devla Taluka of Nashik District) असणाऱ्या फुले माळवाडी (Phule Malwadi) गावाच्या गावकऱ्यांनी आपलं गावच विकायला काढल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र ही गोष्ट खरी आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.
‘या’ गावामध्ये होळीच्या दिवशी दगड फेकून मारले जातात; जाणून घ्या अनोख्या गावाबद्दल माहिती
सध्या शेतातील पिकाला योग्य हमीभाव मिळत नाहीत यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतमालातून उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभा राहील आहे. शेतकरी एवढा संकटात सापडला असून याची दखल सरकारकडून घेतली जात नसल्याने देवळा तालुक्यातील माळवाडी या गावातील शेतकऱ्यांनी संपूर्ण गावच विक्रीला काढले आहे.
चिमुकल्यांनी उडवली शिंदे गटाची खिल्ली; म्हणाले, “आले रे आले गद्दार आले, ५० खोके एकदम ओके”
या गावातील लोकांनी सर्वांच्या एकमताने हा ठराव केला आहे. गावातील शेतकरी (farmer) व महिलांनी एकत्र येत संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे ‘ असा ठराव एकमताने केला आहे. गावकऱ्यांच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता याची सगळीकडे जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
पुढील २४ तासात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? वाचा एका क्लिकवर