सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक शेतकरी शेतातील काम आटपून बैलगाडीने घराच्या दिशेने जात आहे. तेवढ्यात सनी देओल (Sunny Deol) त्या शेतकऱ्याला थांबवतो आणि शेतकऱ्याला विचारतो या बैलगाडीमध्ये तुम्ही काय आणले आहे? यावर उत्तर देत शेतकरी म्हणतो ज्वारीचा भुसा आहे.
पुढील २४ तासात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? वाचा एका क्लिकवर
यांनतर सनी देओल त्या शेतकऱ्यासोबत गप्पा मारू लागतो. यावेळी त्या शेतकऱ्याला माहित नसत सनी देओल आहे. शेतकरी देखील यावेळी सनी देओलसोबत एकदम मनमोकळेपणाने गप्पा मारतो आणि नंतर तो शेतकरी म्हणतो आपण सनी देओल सारखे दिसतंय. यावर सनी देओल पहिल्यांदा हसतो आणि म्हणतो हा मीच आहे. हे एकूण शेतकरी आश्चर्यचकित होतो. आणि सनी देओलच्या हातात हात देत गप्पा मारू लागतो.
चक्क गावाचं काढले विक्रीला; नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावातील लोकांनी घेतला टोकाचा निर्णय
पुढे शेतकरी म्हणतो की, ‘आम्ही तुमचे आणि तुमच्या वडिलांचे व्हिडिओ मोबाइलवर पाहत असतो’. हा व्हिडीओ सनी देओलने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘डाउन टू अर्थ सनी भाऊ’ त्याचबरोबर अनेक युजर हर्ट इमोजीच्या कमेंट करत आहेत.
चिमुकल्यांनी उडवली शिंदे गटाची खिल्ली; म्हणाले, “आले रे आले गद्दार आले, ५० खोके एकदम ओके”